मुख्य मजकुरावर जा
सूचना
वर्षातील ३६५ दिवस सेवा — साप्ताहिक सुट्टी नाही • मुदत ठेवीवर ९.५% पर्यंत व्याज • ज्येष्ठ नागरिकांना ०.५% जादा व्याज • सोने तारण व वाहन तारण कर्ज फक्त ९.९९% • 'अ' वर्ग लेखापरीक्षित संस्था

मुदत ठेव

ठराविक मुदतीसाठी सुरक्षित बचत — ३६५ दिवसांपुढील ठेवीवर ९.५% व्याज, ज्येष्ठ नागरिकांना ०.५% जादा.

व्याजदर
९.५% पर्यंत
मुदत
९० दिवसांपासून
किमान रक्कम
₹ ५,०००
मुदत ठेव

मुदत ठेव म्हणजे ठराविक कालावधीसाठी रक्कम ठेवून निश्चित दराने व्याज मिळवण्याची योजना. माऊली पतसंस्थेत ९० दिवसांपासून मुदत ठेव ठेवता येते.

व्याजदर

  • ९० ते १८१ दिवस — ७% (ज्येष्ठ नागरिक ७.५%)

  • १८२ ते ३६४ दिवस — ८% (ज्येष्ठ नागरिक ८.५%)

  • ३६५ दिवस व त्यापुढे — ९.५% (ज्येष्ठ नागरिक १०%)

व्याज वार्षिक (दर १२ महिन्यांनी) चक्रवाढ पद्धतीने जमा होते. व्याजदर संचालक मंडळाच्या निर्णयानुसार बदलू शकतात; अंतिम दरासाठी शाखेशी संपर्क साधा.

वैशिष्ट्ये

  • ३६५ दिवसांपुढील ठेवीवर ९.५% व्याज
  • ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ०.५% जादा व्याज
  • व्याज वार्षिक चक्रवाढ पद्धतीने
  • मुदतपूर्व रक्कम काढण्याची सुविधा
  • ठेवीच्या ८०% पर्यंत कर्ज उपलब्ध

पात्रता

  • संस्थेचे सभासद (ठेवी फक्त सभासदांकडून स्वीकारल्या जातात)

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • दोन पासपोर्ट आकाराचे फोटो

इतर योजना

माऊली ठेव योजना

आजची शिस्तबद्ध बचत, उद्याची आर्थिक समृद्धी — संस्थेची खास माऊली ठेव योजना.

सविस्तर पहा

दाम दुप्पट ठेव

ठराविक मुदतीत गुंतवलेली रक्कम दुप्पट करणारी ठेव योजना.

सविस्तर पहा

दाम दीडपट ठेव

ठराविक मुदतीत गुंतवलेली रक्कम दीडपट करणारी ठेव योजना.

सविस्तर पहा